मनसैनिकांनी बसवर लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST2021-01-03T04:16:07+5:302021-01-03T04:16:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या ...

Mansainiks boarded the bus | मनसैनिकांनी बसवर लावले

मनसैनिकांनी बसवर लावले

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : औरंगाबादचे नाव बदला अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी नाशिकहून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक लावून २६ जानेवारीपर्यंत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शनिवारी दुपारी अचानकपणे हे आंदोलन केल्याने नवीन सीबीएस परिसरात मोठीच चर्चा रंगली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे फलक चिकटवून अभिनव आंदोलन केले. राज्यशासनातील सत्ताधारी शिवसेनेने नुकतेच औरंगाबादमध्ये सुपर संभाजीनगर असे फलक झळकवल्यानंतर या विषयाला तोंड फुटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीस त्यांचे नाव देण्यात यावे अशी राज्यातील जनतेची भावना असून तशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे, निखिल सरपोतदार, किशोर वडजे, नितीन माळी, अर्जुन वेताळ, चंद्रभान ताजनपुरे, गोकुळ नागरे, साहेबराव खर्जुल, सुनील पाटोळे, शाम गोहाड, संदेश जगताप, सिद्धेश सानप, अक्षय कोंबडे, दत्तात्रय इंगळे आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - ०२ पीएचजेएन ८२

नवीन सीबीएस आंदोलनप्रसंगी मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, मनोज घोडके, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, संजय देवरे, अमित गांगुर्डे आदी.

Web Title: Mansainiks boarded the bus