माणसाचे वर्तन पशूसारखे

By Admin | Updated: November 25, 2015 22:49 IST2015-11-25T22:48:55+5:302015-11-25T22:49:39+5:30

चांदवड : निवृत्ती महाराज चव्हाण यांचे मत

Man's behavior is like an animal | माणसाचे वर्तन पशूसारखे

माणसाचे वर्तन पशूसारखे

चांदवड : मनुष्य जन्म परत मिळत नाही, याकरिता मनुष्याने जीवनात मनुष्यासारखे वागावे, सध्या मनुष्य नियमित जीवनात वागताना पशूप्रमाणे वागत आहे, अशी खंत निवृत्ती महाराज चव्हाण (ठाणगावकर) यांनी बोलून दाखविली. चांदवड येथे चांमको बॅँकेचे माजी अध्यक्ष व व्यापारी दत्तात्रेय पुंजाजी व्यवहारे यांच्या
प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित प्रवचनात ते बोलत होते.
विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आयोजित प्रवचनात चव्हाण महाराज म्हणाले की, आज प्रत्येकाकडे चांगले संस्कार,
चांगल्या सवयी, चांगले आचार विचार असावे, जेणेकरून काहीकाळ भगवंताचे नामस्मरण केल्यास मनुष्याला चांगली सद्गती प्राप्त
होते.
चांगल्या विचारांनी व संस्कारांनी माणूस सुखी व चांगले आरोग्य व
जीवन जगतो, हे स्पष्ट करताना
त्यांनी असंख्य उदाहरणे दिली.
चांगल्या कर्मामुळे मनुष्याला परलोकी स्वर्गात जागा मिळते.
दशक्रिया विधी, प्रथम पुण्यस्मरण केव्हा, कसे करावे, याचेही अनेक दृष्टांत चव्हाण
महाराज यांनी यावेळी दिले.
चांगल्या कर्माची फळे चांगलीच मिळतात. वाईट कर्माची फळे
वाईटच असतात, त्यामुळे मनुष्यजन्मामध्ये चांगले कार्य करून नाव कीर्ती रुपे उरावे, असे कार्य नेहमी करावे, असे सांगून उंदीर
काही सर्पाच्या फन्याखाली राहू शकत नाही, हा दृष्टांत देत चव्हाण महाराज यांनी उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी भीकचंद व्यवहारे, उत्तम व्यवहारे, दीपक व्यवहारे यांनी संतपूजन केले. स्वागत दत्तात्रय राऊत
यांनी केले. प्रास्ताविक अशोक देशमुख यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Man's behavior is like an animal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.