शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

मनपात एप्रिलमध्ये ६८ पदांसाठी भरती

By admin | Updated: March 2, 2017 01:34 IST

नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.

 नाशिक : महापालिकेत एप्रिल महिन्यात वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री अशा एकूण ६८ पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली जाणार असून, त्याबाबत महाआॅनलाइनशी चर्चा सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. याचबरोबर पदोन्नतीचाही प्रश्न मार्गी लावण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.महापालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कामकाज पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेत कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या ही प्रशासनाची मोठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून येणारे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज आणि दुसरीकडे दरमहा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या यामुळे प्रशासकीय कारभार चालविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून नोकरभरतीला मान्यता नाही परंतु शासनाने वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता आणि मिस्त्री या पदांच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात ३२ वैद्यकीय अधिकारी, १९ कनिष्ठ अभियंता आणि १७ मिस्त्री यांची भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी महाआॅनलाइनशी चर्चा सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. दरम्यान, महापालिकेत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदही रिक्त झाले आहे. तसेच शहर अभियंता सुनील खुने यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या ९ मार्चला सुनील खुने निवृत्त होत आहेत. शहर अभियंतापदही रिक्त होणार आहे. प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांचाही तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या ३ मार्चला संपत आहे. त्यामुळे प्रशासन उपआयुक्तपद रिक्त होणार आहे. या रिक्तपदांसाठीही शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून आहे.शहर अभियंतापदी विद्यमान अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता असून, त्यांच्या जागेवर कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याचबरोबर महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे रोस्टर तपासून पदोन्नत्यांचाही प्रश्न निकाली काढण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)