मनपातर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 00:11 IST2016-05-02T23:38:42+5:302016-05-03T00:11:46+5:30
मनपातर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

मनपातर्फे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
नाशिक : उल्लेखनीय कामगिरी बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचा महापालिकेच्या वतीने महाराष्ट्रदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. याचवेळी स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी अभियान आणि आरोग्यविषयक उत्कृष्ट कामगिरीबद्दल सातपूर विभागाला सन्मानित करण्यात आले.
राजीव गांधी भवनच्या प्रांगणात महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेत्या सुरेखा भोसले, शिक्षण समिती सभापती संजय चव्हाण, नगरसेवक सचिन महाजन आदि उपस्थित होते. यावेळी जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणारे सहायक अधीक्षक पी. एन. पवार, कनिष्ठ लिपिक महेश आटवणे, सचिन विधाते, प्रशांत लोणे, शिपाई वीरसिंग मनोहरसिंग, स्वच्छता निरीक्षक एस. आर. वाजपेयी, सफाई कामगार शशिकांत मंडलिक, राहुल खांदवे, बिगारी नितीन शिरसाट, फार्मासिस्ट राजेंद्र पाठक, जलनिर्देशक माया जगताप, शाखा अभियंता बालाप्रसाद गाजूल, मिस्तरी कैलास दायमा, सुरक्षारक्षक रामदास खेलुकर, वायरमन सुधीरकुमार, हेल्पर व्ही. सी. निचिते, कनिष्ठ लेखापरीक्षक विजय तितरे, फायरमन व्ही. के. ताजनपुरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सातपूर विभागाला देण्यात आलेला विशेष पुरस्कार विभागीय अधिकारी चेतना केरुरे यांनी स्वीकारला. सूत्रसंचालन गोपीनाथ हिवाळे यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, जीवनकुमार सोनवणे, उपआयुक्त विजय पगार, हरिभाऊ फडोळ, दत्तात्रेय गोतिसे, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता सुनील खुने, नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल, मुख्य लेखाधिकारी राजेश लांडे, मुख्य लेखा परीक्षक गिरीश देशमुख आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)