मनोहर पर्रीकर : १५० वे ‘सुखोई-30’ भारतीय हवाईदलात सामील

By Admin | Updated: January 9, 2015 23:54 IST2015-01-09T23:54:04+5:302015-01-09T23:54:22+5:30

शेजारील शत्रुराष्ट्रांमुळेच भारत शस्त्रसज्ज

Manohar Parrikar: 150th 'Sukhoi-30' Indian Air Force | मनोहर पर्रीकर : १५० वे ‘सुखोई-30’ भारतीय हवाईदलात सामील

मनोहर पर्रीकर : १५० वे ‘सुखोई-30’ भारतीय हवाईदलात सामील

नाशिक : भारत हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, तथापि, शेजारील काही शत्रुराष्ट्रांमुळे भारताला शस्त्रसज्ज राहावे लागत आहे. त्यामुळे अशा मित्रत्व न बाळगणाऱ्या राष्ट्रांमुळेच शस्त्रांस्त्रांची गरज कायम राहणार आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएलच्या) ओझर येथील कारखान्यात सुखोई या लढावू विमानांच्या निर्मितीचा पहिला १५० विमान निर्मितीचा टप्पा पार पडला. त्याचवेळी विशिष्ट कालावधीनंतर सुखोई विमानांची देखभाल दुरुस्तीसह पुनर्बांधणी करून ते पुन्हा हवाईदलाला सुपूर्द करण्याचा सोहळा शुक्रवारी ओझर येथे पार पडला. यावेळी संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते. हवाई दलप्रमुख अरूप रहा, एचएएलचे अध्यक्ष डॉ. आर. के. त्यागी, सह संचालक के. के. पंत तसेच दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण व नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निफाडचे आमदार अनिल कदम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कर्मचारी वृंद असल्याचे सांगून पर्रीकर यांनी एचएलमधील अधिकारी आणि कर्मचारी वृंदांचे कौतुक केले. आपण एका कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगून पर्रीकर यांनी यापुढे सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.भारतीय हवाई दल एचएएलवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे दोन्ही परस्परावर अवलंबून असल्याचे ते म्हणाले.
एचएएलचे अध्यक्ष डॉ. त्यागी यांनी पुनर्बांधणी केलेले दुसरे सुखोई विमान हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यासाठी सज्ज होत आहे, असे सांगितले. (पान ४ वर)

सुखोईची निर्मिती आणि पुनर्बांधणीची एचएएलमध्ये एका छताखाली सोय करण्यात येणार असून, त्यासंदर्भात क्षमता वाढीसाठी एचएएलच सज्ज असल्याचे सांगितले. नाशिक, कोरापत, लखनौ, कोरवा आणि हैदराबाद यांचा सुखोईच्या निर्मिती आणि पुनर्बांधणीत सहभाग आहे. सुखोईचा पुनर्बांधणी करण्यासाठी नाशिकमधील कारखाना जगातील एक महत्त्वाचा कारखाना आहे. त्याशिवाय दहा देशांत अशा प्रकारची सेवा देण्याची क्षमता येथे असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुखोई-३० एमकेआय, एसबी०२७ तसेच नव्याने निर्मित केलेले १५० वे सुखाई ३० एमकेआय हे लढावू विमान संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते हवाई दलाला सुपूर्द करण्यात आले. यावेळी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक एस. सुब्रमण्यम् यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
(प्रतिनिधी)

Web Title: Manohar Parrikar: 150th 'Sukhoi-30' Indian Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.