शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडचा पाणीप्रश्न बिकट

By admin | Updated: December 26, 2015 00:18 IST

नरेंद्र दराडे : पिण्याच्या पाण्यासाठी पालखेडचे तत्काळ आवर्तन द्या

येवला : पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन मजूर आहे, ते द्यायचे आहेच मग जिल्हा प्रशासन उशीर का करत आहे. पाणी योजनांच्या साठवण तलावांनी तळ गाठला असून, यामुळे मनमाडला नागरिकांचे सर्वाधिक हाल सुरू आहेत. अनेकांना तर पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पालखेडच्या भरवशावर असलेल्या गावांतील चित्रही कठीण आहे. त्यामुळे पालखेडचे आवर्तन त्वरित देण्याची मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी केली आहे.सिंचनाला एक आवर्तन देणे गरजेचे होते, त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली; पण जलसंपदा विभागाने याची दखल घेतली नसल्याने एका पाण्याअभावी रब्बीचे पीक हातचे गेले असून, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाने लेखी पत्र देत पाणी सिंचनाला देणार नसल्याचे सांगत पिण्यासाठी आरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मग आता प्यायला पाणी शिल्लक राहिले नसताना आवर्तन देण्यास उशीर का केला जात आहे, असा सवाल दराडे यांनी केला आहे.मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलवाचा गाळ उघडा पडला आहे. त्यामुळे २० दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. येवल्यालादेखील आवर्तन लांबल्याने सहा दिवसाआड पाणीपुरवठा पालिकेने सुरू केला असून, येवला ३८ गाव योजनेच्या साठवण तलावाने तळ गाठल्याने पाणीकपात सुरू झाली आहे. आवर्तन लांबवले जात असल्याने गावोगावच्या पाणी योजना तसेच वाड्यावस्त्यांवरदेखील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिणामी शहरात तसेच काही गावांमध्येही नागरिक विकत पाणी घेऊन गरज भागवत आहे. जनावरांनादेखील प्यायला पाण्याचा अभाव जाणवत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाड येथील बैठकीत डिसेंबरच्या शेवटापर्यंत प्यायला आवर्तन देतो असे सांगितले; पण अजून कुठलीच हालचाल नसल्याने नागरिकांचे पाण्याअभावी हाल सुरू आहेत. गावोगावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न आणि वाड्यावस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे येवल्यातील गावोगावचे पिण्यासाठी आरक्षित असलेले सर्व २६ बंधारेदेखील या आवर्तनातून भरून द्यावेत म्हणजे ग्रामीण भागातील टंचाई दूर होण्यास मदत होणार असून, आता सर्वत्र पाणी संपल्याने तत्काळ आवर्तन सोडावे, यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले. (वार्ताहर)