मनमाडला चोरट्यांनी चोरली साडेतीन लाखाची सुपारी
By Admin | Updated: October 24, 2015 22:26 IST2015-10-24T22:26:24+5:302015-10-24T22:26:51+5:30
मनमाडला चोरट्यांनी चोरली साडेतीन लाखाची सुपारी

मनमाडला चोरट्यांनी चोरली साडेतीन लाखाची सुपारी
मनमाड : मनमाड - येवला रोडवर अनकवाडे शिवारात जम्मू चौधरी ढाब्याजवळ रात्री उभ्या असलेल्या मालट्रकची (क्र. केए १६ पी ६००९) ताडपत्री कापून तीन लाख ५९ हजार रुपयांची २२ गोण्या सुपारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी ट्रकचालक गौतमसिंग तिलकसिंग (२३) रा. नरोडी, ता. नवरोध पठाणकोट, पंजाब यांनी मनमाड शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अधिक तपास पो. कर्मचारी दगू बारहाते करत आहेत. (वार्ताहर)