मनमाडच्या खेळाडूला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:15 IST2020-02-14T22:56:21+5:302020-02-15T00:15:48+5:30
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेद्वारा आयोजित आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन ताश्कंद येथे करण्यात आले असून, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद संतोष आहेर याने १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.

मनमाडचा खेळाडू मुकुंद आहेर याच्या सत्कारप्रसंगी प्रवीण व्यवहारे, तृप्ती पाराशर, जयराम सानप आदी़
मनमाड : आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग संघटनेद्वारा आयोजित आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन ताश्कंद येथे करण्यात आले असून, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेला येथील छत्रे विद्यालयाच्या मुकुंद संतोष आहेर याने १८९ किलो वजन उचलून ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले.
खेलो इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मुकुंदने आता आंतरराष्ट्रीय यूथ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावित चांगली मजल मारली
आहे़ शहरातील निकिता काळे नंतर मुकुंदने आंतरराष्ट्रीय आशियाई यूथ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला आहे. यशस्वी खेळाडूला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, एन.आय.एस. प्रशिक्षक तृप्ती पाराशर, जय भवानी व्यायामशाळेचे जयराम सानप, छत्रे विद्यालयाचे सचिव दिनेश धारवाडकर मुख्याध्यापिका के. एस. लांबोळे यांचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा मुकुंद हा नाशिक जिल्ह्यातील पहिलाच वेटलिफ्टिंग खेळाडू ठरला आहे. उझबेकिस्तानच्या खेळाडूची कडवी लढत मोडीत काढत मुकुंदने सुवर्णपदक पटकावले आहे.