मनमाडच्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास कोठडी
By Admin | Updated: September 22, 2016 01:22 IST2016-09-22T01:21:51+5:302016-09-22T01:22:40+5:30
मनमाडच्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास कोठडी

मनमाडच्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास कोठडी
नाशिक : अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी संशयिताच्या पित्याकडून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला मनमाडचा पोलीस कर्मचारी आनंदा रामदास शिंपी (रा़ मनमाड) यास एसीबी न्यायालयाने बुधवारी (दि़ २१) एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़
मनमाड येथे समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबीयांमध्ये असलेल्या वादातून एका कुटुंबातील युवती बेपत्ता झाली होती़ या मुलीचा शोध घेऊन तिला पोलीस कर्मचारी शिंपी याने पालकांच्या ताब्यात दिले होते़
यानंतर या कुटुंबीयांचा वाद झालेल्या कुटुंबाशी संपर्क साधून मुलावर अपहरणासह बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी शिंपी याने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती़ तडजोडीनंतर दहा हजार रुपये देण्याचे ठरले़ मुलाच्या वडिलांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ (प्रतिनिधी)