मनमाडला कोरोनाचे एकाच दिवसात ५५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 19:03 IST2021-03-18T19:02:53+5:302021-03-18T19:03:22+5:30
मनमाड : शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मनमाडला कोरोनाचे एकाच दिवसात ५५ रुग्ण
मनमाड : शहरात एकाच दिवशी कोरोनाचे ५५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मनमाडमधील ९२ स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी काल रात्री ५५ रुग्णांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १४१ वर गेली आहे. शहरात आतापर्यंत एकूण १३६४ कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यापैकी ११७७ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा नव्याने ९५ स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. त्यामुळे मनमाडकरांवर कोरोनाचे गंभीर सावट पसरले आहे. शहरात गेल्या महिनाभर तुरळक कोरोना रुग्णसंख्या असताना अचानक मार्च महिना सुरू होताच कोरोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला आहे.