मनमाडकरांना आता महिन्यातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:09+5:302021-05-30T04:13:09+5:30

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा ...

Manmadkarna now a month | मनमाडकरांना आता महिन्यातून

मनमाडकरांना आता महिन्यातून

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने सध्या बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता चौदा ते पंधरा दिवसांआड करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मनमाडकरांना महिन्यातून अवघे दोनच दिवस पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या तीस जून रोजी पालखेडच्या पाण्याचे रोटेशन मिळाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाडकर पुरते हैराण झाले आहेत. यावर्षी मनमाडसह परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. सध्या शहरात तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असल्याने वागदर्डी धरणात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत असल्याने त्याचाही काहीसा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. येथील जलशुद्धीकरण केंद्रांना कमी ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होत असल्याच्या अनुषंगाने पालिका प्रशासनामार्फत तरंग विद्युत मोटारींची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता शहराला १२ दिवसांऐवजी चौदा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनमाड शहरासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या ३० जून रोजी मिळणार असल्याने त्यानंतर पाणीपुरवठ्याच्या दिवसांत कपात होण्याची शक्यता आहे.

इन्फो

आवर्तनाची प्रतीक्षा

पालिकेतर्फे शिवाजीनगर, शिवाजी चौक, कॉलेज भाग, चंदनवाडी, मुरलीधरनगर, कॅम्प भाग अशा सहा ठिकाणी असलेल्या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. वीजपुरवठा खंडित तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत असते. या महिन्यात मिळणारे पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास उन्हाळा पार होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

फोटो- २९ मनमाड वागदर्डी

===Photopath===

290521\29nsk_29_29052021_13.jpg

===Caption===

फोटो- २९ मनमाड वागदर्डी

Web Title: Manmadkarna now a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.