‘मनमाडला रेले रोको करणार’

By Admin | Updated: July 31, 2014 00:55 IST2014-07-30T23:17:49+5:302014-07-31T00:55:35+5:30

‘मनमाडला रेले रोको करणार’

'Manmad will stop Raleigh' | ‘मनमाडला रेले रोको करणार’

‘मनमाडला रेले रोको करणार’

 सटाणा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षणामध्ये राज्य शासनाने समावेश करण्यासाठी राज्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्यात येऊन मनमाड येथे जिल्ह्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने सामील होऊन रेल रोको केला जाणार असल्याचे बागलाण तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष प्रा़ मधुकर नंदाळे यांनी केले़
येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणात बागलाण तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या संघटन सभेत प्रा. नंदाळे बोलत होते़ बारामती येथे गेल्या पंधरा दिवसांपासून आरक्षणसंदर्भात लढा उभारला असता सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ राज्य शासनाच्या विरोधात सर्वपक्षीय धनगर समाज संघटित होऊन राज्यात ठिकठिकाणी सांस्कृतिक आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात धनगर समाज शैक्षणिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या पूर्णपणे मागासलेला असून, गेल्या ६५ वर्षापासून राज्य घटनेच्या तरतुदीनुसार केवळ धनगर आणि धनगड या र व ड या भाषिक फरकामुळे समाजाला सवलतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. धनगर व धनगड ही एकच जमात असून, केवळ राजकीय सुडापोटी या समाजाला सवलतींपासून जाणूनबुजून दूर ठेवण्यात येत आहे. शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़ यावेळी कृती समितीचे संघटक अरुण शिरोळे, अनिल जाधव, दीपक पाकळे यांची भाषणे झाली़ यावेळी नगरसेवक भारत काटके, शंकर कांदळकर, दीपक पाकळे, सी.पी. पाकळे, मुन्ना धाबळे, अनिल पाकळे, प्रभाकर वानले, दीपक नंदाळे, सीताराम गोयकर, बापू ढेपले, योगेश शिरोळे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: 'Manmad will stop Raleigh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.