मनमाड : चांदवड रोडवर असलेल्या महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. माती टाकून नागरिकांनी ही आग विझवली असली तरी, निमोण चौफुली भागातील अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर यासह अन्य विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले.महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी रोहित्राजवळ उघडे फ्यूज तसेच लोंबकळणाऱ्या वीजतारा पहावयास मिळतात. चांदवड रोडवरील सानप सर्व्हिस सेंटरच्या शेजारी असलेल्या रोहित्राने शुक्रवारी अचानक पेट घेतला. यामुळे परिसरातील नागरिकांची एकच धावपळउडाली.नागरिकांनी समयसूचकता दाखवत माती टाकत ही आग आटोक्यात आणली. मात्र रोहित्र जळाल्याने हनुमाननगर भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. निमोण चौफुली भागात काही भागाचा वीजपुरवठा सुरू असला तरी अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर, मोबाइल चार्जर आदी उपकरणे जळाल्याने आर्थिक नुकसान झाले. आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही.वीज वितरणच्या कारभाराचा नाहक आर्थिक फटका नागरिकांना बसला असून, संताप व्यक्तहोत आहे. नागरिकांच्या नुकसानीला जबाबदार असणाºया महावितरणविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलीआहे.
मनमाडला रोहित्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:55 IST
चांदवड रोडवर असलेल्या महावितरणच्या रोहित्राला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. माती टाकून नागरिकांनी ही आग विझवली असली तरी, निमोण चौफुली भागातील अनेक घरांतील टीव्ही, मिक्सर यासह अन्य विद्युत उपकरणे जळाल्याने मोठे नुकसान झाले.
मनमाडला रोहित्राला आग
ठळक मुद्देअनेक घरांतील उपकरणे जळाली