मनमाड : चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी असुरक्षित

By Admin | Updated: May 16, 2015 23:34 IST2015-05-16T23:33:55+5:302015-05-16T23:34:38+5:30

तीन प्रवासी रेल्वे गाड्यांमधून साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास

Manmad: Traveling insecure due to the rising incidents of thieves | मनमाड : चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी असुरक्षित

मनमाड : चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी असुरक्षित

मनमाड : येथीाल मनमाड रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या तीन प्रवासी रेल्वे गाड्यामधून आज्ञान चोरट्यांनी साडे सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सदर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असुरक्षेतचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेल्वे गाडी क्रमांक ११०९३ महानगरी एक्स्प्रेसच्या बी-१ या आरक्षित बोगीतून प्रवास करत असलेल्या पूनम वैशिष्ट चोब, रा. गणेशनगर भांडूप या महिलाची पर्स आज्ञात चोरट्यांनी मनमाड रेल्वेस्थानक येण्यापूर्वी लंपास केली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, हार मंगळसूत्र, चैन, अंगठी, कंगण यांसह रोख रक्कम २२ हजार असा एकूण पाच लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी सदर माहिलेने भुसावळ लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दाखल केली. सदर घटना मनमाड हद्दीत घडल्याने मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत आझाद हिंंद एक्स्प्रेस ही गाडी मनमाड रेल्वेस्थानकावर उभी असताना या गाडीतून प्रवास करत असलेल्या मीनाक्षी मयूर चावरे, रा : नागपूर यांची हॅण्डबॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. बॅगमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा २६ हजार रुपयांचा मोबाइल, रोख ३७०० रुपये, असा २९,७०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची फिर्याद मनमाड लोहमार्ग पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत दादर-शिर्डी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या रोमा राजीवन टीयर, रा: विक्रोळी, मुंबई या आरक्षित बोगीतून शिर्डी ते मुंबई असा प्रवास करत असताना मनमाडजवळ त्यांचा कॅमेरा, मोबाइल व रोख रक्कम अशी एकूण ३०,४४२ रुपयांचा ऐवज असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली.(वार्ताहर)

Web Title: Manmad: Traveling insecure due to the rising incidents of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.