मनमाड : बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यात प्राजक्ता खालकर हिने ६४ किलो वजनी गटात, निकिता काळे हिने ७१ किलो वजनी गटात, तर करु णा रमेश गाढे हिने ७६ किलो वजनी गटात कांस्यपदक प्राप्त केले.तसेच नूतन दराडे हिने ४९ किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल आणि अनामिका शिंदे हिने ब्रांझ मेडल प्राप्त केले. सर्व यशस्वी खेळाडूंचा प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे, उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कुलसचिव समाधान केदारे यांनी सत्कार केला. शारीरिक शिक्षण संचालक प्रदीप वाघमारे व क्रीडा मार्गदर्शक प्रवीण व्यवहारे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:34 IST