मनमाड : इटारसीजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडली
By Admin | Updated: June 18, 2015 00:19 IST2015-06-17T23:10:55+5:302015-06-18T00:19:54+5:30
पुष्पक, कामायनीचा मार्ग बदलला

मनमाड : इटारसीजवळ सिग्नल यंत्रणा कोलमडली
घोटी/मनमाड: इटारसी यार्डमधील पॅनल कॅबिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे सिग्नल यंत्रणा कोलमडल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. परिणामी मनमाड स्थानकावरून बुधवारी जाणाऱ्या पुष्पक व कामायनी एक्स्प्रेच्या मार्गात बदल करण्यात आल्याने या गाड्या मनमाड येथे आल्याच नाही.
इटारसी रेल्वेची सिग्नल यंत्रणा मार्ग बदल करण्यासाठी संगणक यंत्रणेच्या कॅबिनला अचानक आग लागल्यामुळे तेथील सर्व रेल्वे सेवा बंद पडली असल्याने इटारसी मार्गाने मुंबईला येणाऱ्या गाड्यांचा मार्गक्र म बदलण्यात येऊन सर्व गाड्या भोपाळमार्गे वळविण्यात आल्या आहेत. यामुळे आठ गाड्यांचा समावेश असून, मंगला एरणाकुलम एक्स्प्रेस व मुंबई हावडा अलाहाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्याच प्रमाणे मुंबई नागपूरमार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत होत्या.
या स्थानकावरून मनमाडमार्गे मुंबईकडे जाणारी पुष्पक एक्स्प्रेस व कामायनी एक्स्प्रेस ही मार्ग
बदलून सुरतमार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आली. खंडव्यापर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या सुरळीत सुरू होत्या.
या बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीस व्यत्यय आल्याने काही गाड्या उशिराने धावत होत्या. सध्या मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे गाड्या फुल्ल असून, सदर प्रकारामुळे प्रवासी वर्गाची काही प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. मनमाड रेल्वे स्थानकावरून मुंबइसाठी सुटनारी पंचवटी, गोदावरी एक्सप्रेस सह अन्य एक्सप्रेस गाड्या सुरळीतपने सुरू होत्या.(वार्ताहर)