मनमाड : रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 23:48 IST2016-04-01T23:47:34+5:302016-04-01T23:48:53+5:30
पादचारी पुलाच्या पायऱ्या उखडल्या

मनमाड : रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडून संताप
मनमाड : रेल्वेस्थानकावर बांधण्यात आलेल्या नवीन पादचारी पुलाच्या पायऱ्या उखडल्या असून, प्रवाशांना हा जिना चढउतार करताना कसरत करावी लागत आहे. अवघ्या काही कालावधीमध्येच नवीन पुलाच्या पायऱ्यांना भागदाड पडल्याने कामाचा दर्जा व गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मनमाड रेल्वेस्थानकावर प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पहाता तिकीट घराजवळून लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या एकमेव पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असते.
गाडी आल्यानंतर स्टेशन बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने पादचारी पुलावरून बोहर येणारे व रेल्वेस्थानकात प्रवेश करणारे प्रवासी यांना बराच वेळ लागत असे. ही प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने पार्सल कार्यालयासमोरील पार्किंगकडून नवीन पादाचारी पूल बांधण्यात आला. गेल्या काही महिन्यांपूर्वी या पुलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करून हा पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता. या नवीन पुलाच्या टाइल्स निखळू लागल्या आहे. अनेक ठिकाणी टाइल्स निघून खड्डे पडले. (वार्ताहर)