मनमाडच्या पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

By Admin | Updated: September 20, 2016 23:57 IST2016-09-20T23:57:01+5:302016-09-20T23:57:48+5:30

मनमाडच्या पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

Manmad police personnel arrested while taking a bribe | मनमाडच्या पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

मनमाडच्या पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

मनमाड : शहर पोलीस ठाण्याचे कॉन्सटेबल आनंदा रामदास शिंपी यांना नाशिक रोड येथे दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी सदरची कार्यवाही केली.
मनमाड येथील तक्रारदार यांच्या घरासमोर राहाणारी मुलगी बेपत्ता झाली होती. तक्रारदार व बेपत्ता मुलीचे पालक यांच्यामधे वाद होता. सदर बेपत्ता मुलीचा शोध पोलीस कॉन्सटेबल आनंदा रामदास शिंपी यांनी घेउन पालकांच्या ताब्यात दिले होते. शिंपी यांनी तक्रारदाराची भेट घेउन समोरची मुलगी बेपत्ता होण्यामधे तुमच्या मुलाचा हात आहे.त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करावा लागेल.गुन्हा दाखल करायचा नसल्यास ५० हजार रूपये द्यावे लागतील असे सांगीतले.तडजोडी अंती १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली.त्यावरून सापळा रचून नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील रेणुका माता टी स्टॉल जवळ दहा हजार रुपयांची लाच घेताना शिंपी यांना रंगेहात पकडले.(वार्ताहर)

Web Title: Manmad police personnel arrested while taking a bribe