मनमाड पालिकेत कामबंद आंदोलन

By Admin | Updated: July 18, 2014 00:37 IST2014-07-17T22:16:01+5:302014-07-18T00:37:00+5:30

मनमाड पालिकेत कामबंद आंदोलन

Manmad Paliyak in the Kambandh movement | मनमाड पालिकेत कामबंद आंदोलन

मनमाड पालिकेत कामबंद आंदोलन

 मनमाड : पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. उद्या सायंकाळपर्यंत याबाबत तोडगा न निघाल्यास अत्यावश्यक सेवांचा या बंदमध्ये सहभाग करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र रोजंदार नगर परिषद कर्मचारी कृती समिती, म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी संघटना (सीटू), रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद, माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन, व्यापारी महासंघाचे राजेंद्र पारीक आदिंसह अनेकांनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
यावेळी रामदास पगारे, नितीन पाटील, किरण अहेर, दीपक धिवर, रवींद्र वाघेले, मनोज फटांगळे, प्रमोद सांगळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Manmad Paliyak in the Kambandh movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.