मनमाड नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल
By Admin | Updated: February 25, 2016 23:19 IST2016-02-25T22:56:29+5:302016-02-25T23:19:02+5:30
मनमाड नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल

मनमाड नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल
मनमाड : येथील नगराध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. २६) होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण नाईक यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकमेव नाईक यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
१२ मे २०१५ रोजी मैमुना तांबोळी यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. ठरल्याप्रमाणे ९ महिन्यांचे आवर्तन पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. पुढील नऊ महिन्यांसाठी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण नाईक यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याने त्यांचेच अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकारी वासंती माळी यांच्याकडे दाखल दाखल करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, राजाभाऊ आहिरे, संतोष बळीद यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीत प्रवीण नाईक यांच्या नावाची नगराध्यक्षपदी वर्णी लागणार
आहे.
दरम्यान, येत्या नोव्हेंबर मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, त्यापूर्वीचे हे शेवटचे सत्तांतर समजले जात आहे. (वार्ताहर)