मनमाडला अप्पर तहसिलदारांची नियुक्ती
By Admin | Updated: September 4, 2016 00:25 IST2016-09-04T00:10:27+5:302016-09-04T00:25:47+5:30
मनमाडला अप्पर तहसिलदारांची नियुक्ती

मनमाडला अप्पर तहसिलदारांची नियुक्ती
नांदगाव : पिंपळनेरच्या धर्तीवर मनमाडला अप्पर तहसीलदार नियुक्त व्हावा हि मनमाडकरांची मागणी अखेर मान्य करीत विभागीय महसूल आयुक्तांनी मनमाडला परिवीक्षाविधीन तहसीलदार रचना पवार यांची अप्पर तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे मनमाड व हिसवळ मंडळा चा कारभार सोपविण्यात आला आहे गणेशाच्या आगमनासोबतच नव्या अप्पर तहसीलदारांची नियुक्ती मनमाड साठी अनोखी भेट ठरली आहे पवार यांची नियुक्ती पाच महिन्यासाठी आहे. मनमाडला अप्पर तहसीलदार पद थापीत होत असल्याने अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे.
दरम्यान नांदगाव साठी ज्यांची जामनेर येथून बदली करण्यात आली ते जामनेरचे तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांना जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्याने नांदगावला निवासी नायब तहसीलदाराकडे पदभार सोपवून महसूलचा गाडा हाकला जाणार आहे. राजेंद्र कचरे यांना नांदगावचे प्रांत म्हणून नियुक्त करण्यात आलेले
आहे