मनमाडला एकाच दिवसात आढळले ३२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:50 IST2020-09-03T20:49:05+5:302020-09-04T00:50:33+5:30
मनमाड : शहरात एकाच दिवसात नव्याने ३२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. त्यामुळे मनमाडची काळजी आणखी वाढली आहे.

मनमाडला एकाच दिवसात आढळले ३२ रुग्ण
ठळक मुद्दे३८८ जण बरे झाले आहे ही समाधानाची बाब
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : शहरात एकाच दिवसात नव्याने ३२ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. त्यामुळे मनमाडची काळजी आणखी वाढली आहे. येथील पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ४६७ वर गेली आहे त्यापैकी ३८८ जण बरे झाले आहे ही समाधानाची बाब आहे.
येथील ६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे त्यातील १० जणांवर मनमाड येथील कोविड उपचार केंद्रात तर ५७ रुग्णांवर त्याच्या घरी उपचार सुरू आहे. आजपर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एकूण २६ कटेनमेंट झोन आहे तेथे विविध निर्बध लागू आहेत.