मनमाड : भय इथले संपत नाही...
By Admin | Updated: March 11, 2016 23:02 IST2016-03-11T22:54:57+5:302016-03-11T23:02:52+5:30
गारपीटग्रस्तांच्या भावनांचे ‘सोशल मीडियावर’ प्रतिबिंब!

मनमाड : भय इथले संपत नाही...
गिरीश जोशी ल्ल मनमाड
जिवंतपणी मृत्यू
अनुभवयाचा असेल तर..
बाग लावा बाग...
याबरोबरच
हमे टोमॅटोने लुटा..
मका को कहा पाणी था..
जब हमने द्राक्षो पे जोर दिया..
तो सब वावर मे ‘गार’ था...
या व अशा अनेक पोस्टची सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे.
नुकताच झालेला अवकाळी पाऊस व गारपीट शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी असली तरी या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सोशल मीडियावरून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यात येत असल्याचे दिसून येते. गारपिटीने धास्तावलेल्या शेतकऱ्याची ‘भय इथले संपत नाही’ अशी परिस्थिती झाली आहे.
गेल्या आठवडाभरापूर्वी परिसरातील बळीराजावर अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. बेमोसमी पावसाने परिसरातील गावांमधे विजांच्या कडकडाटासह गारपीट झाली असून, शेतांमध्ये गारांचा खच पडला होेता. या पावसामुळे कांदा, गहू, हरबरा या बरोबरच द्राक्ष व डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा एक्स्पोर्ट होणारा द्राक्षमाल गारपिटीमुळे खराब झाला. यावर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली असून, या बेमोसमी पावसामुळे कांद्याचे पीक शेतात आडवे झाले. काही ठिकाणी काढणीस आलेल्या कांद्यावर गारपीट झाल्याने कांद्याच्या पातीचे शेंडे खुडले गेल्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याची वेळ आली. अचानक गारपिटीसह झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला. या संकटातूनही बळीराजा मोठ्या धिराने सावरला आहे.