मनमाडला बाह्यरुग्ण विभागातील कामकाज बंद
By Admin | Updated: May 9, 2017 01:50 IST2017-05-09T01:50:20+5:302017-05-09T01:50:37+5:30
मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस केलेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.

मनमाडला बाह्यरुग्ण विभागातील कामकाज बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस केलेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बाह्यरुग्ण विभागातील कामकाज बंद ठेवले. येत्या दोन दिवसात दोषींवर कारवाई न झाल्यास बेमुदत बंद पाळण्याचा इशारा देण्यात आला
आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करून देण्यासाठी नकार दिला याचा राग आल्याने रुग्णाने व त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोंगडे व परिचारिका शोभा अहिरे यांना मारहाण केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
मारहाण प्रकणाचा निषेध करण्यासाठी डॉक्टरांच्या संघटनेने संपाचे हत्यार उपसले. एक दिवस बाह्यरग्ण विभागातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अत्यावष्यक सेवा मात्र सुरू सुरू ठेवण्यात आल्या आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाउन आज कामकाजात सहभाग घेतला. येथील उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बाबद जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहर पोलीस ठाण्यात निवेदन देउन दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली.येत्या दोन दिवसात कार्यवाही न झाल्यास बेमूदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.