मनमाड : ख्रिस्ती हक्क संरक्षण समिती
By Admin | Updated: July 26, 2016 22:15 IST2016-07-26T22:15:27+5:302016-07-26T22:15:27+5:30
ध्वजस्तंभासाठी मूक मोर्चा

मनमाड : ख्रिस्ती हक्क संरक्षण समिती
मनमाड : येथील पोस्ट आॅफिसजवळील मिशन कंपाउंडमध्ये ख्रिस्ती समाजबांधवांकडून करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणाचा ध्वजस्तंभ काढून टाकण्यात आल्याच्या प्रश्नावर ख्रिस्ती मूलभूत हक्क संरक्षण समितीच्या वतीने मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
संत बार्णबा चर्च कमिटीच्या मालकीचा हा ध्वजस्तंभ गेल्या काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आला आहे. हा ध्वजस्तंभ पूर्ववत लावण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी बार्णबा चर्च येथून ख्रिस्ती समाजबांधवांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढला. पालिका कार्यालय, एकात्मता चौक मार्गे हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचला. शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या मोर्चानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्ही. डी. देठे, दिलीप सूर्यवंशी, माणिक जाधव, सतीश सूर्यवंशी, जोसेफ मॅन्युअल, विजयानंद अस्वले, शिमोन पाटोळे, दयानंद मकासरे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)