मनमाडला गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:42 IST2019-04-07T16:41:35+5:302019-04-07T16:42:04+5:30

मनमाड: येथील वेदिका ब्राह्मण महिला मंडळ, श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.

 Manmad is celebrating the occasion of Gudi Padva | मनमाडला गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा

मनमाडला गुढीपाडव्या निमित्त शोभायात्रा

ठळक मुद्देदत्त मंदिर येथे, राम रक्षा पठाणाने शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी शोभायात्रेमध्ये भगवे ध्वज ,पताका या मुळे वातावरण भगवेमय झाले होते.


मनमाड: येथील वेदिका ब्राह्मण महिला मंडळ, श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. दत्त मंदिर शिवाजी नगर येथून निघालेली मिरवणूक सुभाष रोड , गांधी चौक , एकात्मता चौक, नेहरू रोड, रेल्वे स्टेशन, इंडियन हायस्कूल , शिवाजी चौक मार्गे काढण्यात आली.
श्रीराम जय राम जय जय राम च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणा देण्यात आल्या.
 

Web Title:  Manmad is celebrating the occasion of Gudi Padva