मनमाडला छत्रे विद्यालयात योगदिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 18:03 IST2019-06-21T18:02:50+5:302019-06-21T18:03:21+5:30

मनमाड : विश्व योग दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या वतीने योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .राज्यस्तरीय योग स्पधेर्तील विजेत्या खेळाडू दिया किशोर व्यवहारे व प्रतिष्ठा प्रवीण व्यवहारे यांनी योगाची उत्कृष्ट आसने सादर करीत उपस्थित सर्व विद्यार्थी पालक शिक्षक संस्थेचे पदाधिकारी यांचेकडून योगाभ्यास करून घेतला .

  Manmad celebrates Yogidi in Chhatre Vidyalaya | मनमाडला छत्रे विद्यालयात योगदिन साजरा

मनमाडला छत्रे विद्यालयात योगदिन साजरा

ठळक मुद्देया वेळी संस्थेचे अध्यक्ष पी. जे दिंडोरकर ,सचिव दिनेश धारवडकर ,संचालक प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापिका के.एस. लांबोळे ,उपमुख्याध्यापक आर.एन.थोरात पर्यवेक्षक संदीप देशपांडे,प्रवीण व्यवहारे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी आदी उपस्थित होते

मनमाड : विश्व योग दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या वतीने योगा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .राज्यस्तरीय योग स्पधेर्तील विजेत्या खेळाडू दिया किशोर व्यवहारे व प्रतिष्ठा प्रवीण व्यवहारे यांनी योगाची उत्कृष्ट आसने सादर करीत उपस्थित सर्व विद्यार्थी पालक शिक्षक संस्थेचे पदाधिकारी यांचेकडून योगाभ्यास करून घेतला .

क्रिडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांनी प्रत्येक आसनाचे व योगाभ्यासाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय छात्र सेना हरित सेना तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयात योगदिन
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग केल्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. तसेच आनंददायी जीवनासाठी नियमित योगासने करणे लाभदायक आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.जी जाधव यांनी केले . योगाचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१४ मध्ये युनोत विषद केले. त्यानंतर जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी योगाचा स्वीकार केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.जगदाळे, उपप्राचार्य डॉ. डी.जी. जाधव, उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य एस.एच.भामरे , व्यवसाय शिक्षण विभागाचे उपप्राचार्य आर . जी . ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण वगार्चे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण शिबीरास सौ.स्वाती मुळे यांनी योगासनांची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन केले. योग शिबिराच्या शेवटी सर्व छात्रांना ५० महाराष्ट्र बटालियन ,एन.सी.सी औरंगाबाद व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . पी.आर . बर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ पी. बी परदेशी यांनी केले. या शिबीरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

 

Web Title:   Manmad celebrates Yogidi in Chhatre Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.