मनमाड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By Admin | Updated: December 10, 2015 23:02 IST2015-12-10T23:02:01+5:302015-12-10T23:02:56+5:30
मनमाड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मनमाड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
मनमाड: मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ३१ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बाजार समितीमध्ये कोणत्या गटाची सत्ता येणार याबाबत ग्रामीण भागात औत्सुक्य निर्माण झाले आहे.
या निवडणुकीसाठी मतदार याद्या जाहीर झाल्या आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध गट सक्रिय झाले आहेत. शिवसेना पुरस्कृत सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, गंगाधर बिडगर यांच्या पॅनलची घोषणा झाली आहे, तर त्यांच्या विरोधात आमदार पंकज भुजबळ यांच्या गटातर्फे प्रकाश घुगे, राजेंद्र पवार, व्यंकट अहेर आदि कोणती भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल. (वार्ताहर)