अधिकारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी मानकर
By Admin | Updated: September 7, 2016 01:15 IST2016-09-07T01:15:01+5:302016-09-07T01:15:11+5:30
अधिकारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी मानकर

अधिकारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी मानकर
नाशिक : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या २०१६ ते २०१९ या त्रैवार्षिक निवडणुकीत माहिती व जनसंपर्क संचालक शिवाजी मानकर यांची मुंबई उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
गोरेगाव येथे राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैमासिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, त्यात ही निवड करण्यात आली. या सभेस राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय उपस्थित होते. मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात मानकर कार्यरत असून, त्यांचे काव्यसंग्रह, माहितीपट व पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या निवडीबद्दल राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा शाखेने अभिनंदन केले आहे.