घोटेवाडीच्या सरपंचपदी मंजुश्री घोटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST2021-03-01T04:16:10+5:302021-03-01T04:16:10+5:30

सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंजुश्री भरत घोटेकर यांची तर उपसरपंचपदी रंजना चंद्रभान घोटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

Manjushree Ghotekar as Sarpanch of Ghotewadi | घोटेवाडीच्या सरपंचपदी मंजुश्री घोटेकर

घोटेवाडीच्या सरपंचपदी मंजुश्री घोटेकर

सिन्नर: तालुक्यातील घोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंजुश्री भरत घोटेकर यांची तर उपसरपंचपदी रंजना चंद्रभान घोटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच, उपसरपंच निवडीसाठी शुक्रवारी (दि.२६) घोटेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन केले होते. यावेळी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत सरपंचपदासाठी मंजुश्री भरत घोटेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर गोरक्षनाथ घोटेकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती.

उपसरपंचपदासाठी रंजना चंद्रभान घोटेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून संगीता हौशीराम घोटेकर यांनी स्वाक्षरी केली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने आणि दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरले. सरपंचपदी मंजुश्री भरत घोटेकर तर उपसरपंचपदी रंजना चंद्रभान घोटेकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी केली. त्यांना ग्रामसेवक संदीप वाकचौरे यांनी सहाय्य केले.

---------------

फोटो ओळी- घोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंजुश्री भरत घोटेकर तर उपसरपंचपदी रंजना घोटेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना सदस्य आणि ग्रामस्थ. (२७ घोटेवाडी)

Web Title: Manjushree Ghotekar as Sarpanch of Ghotewadi