शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

मनीषा चोपडे मृत्यू प्रकरणाचे गूढ कायम

By admin | Updated: January 20, 2016 22:24 IST

देवगाव : मुलीच्या न्यायासाठी माता-पित्याचा आक्रोश

विंचूर : ‘‘परिस्थिती गरिबीची असली तरी मनीषाला शिकायची इच्छा होती.. पण त्या राक्षसांनी माझ्या मनीषाला कायमचं संपवलं... नियतीला माझ्या पोरीचं स्वप्न पाहवलं नाही.. माझी मनीषा कायमचीच गेली हो...’’ - कठोर काळजालाही मायेचा पाझर फुटावा असा माता-पित्याचा आक्र ोश तीन आठवड्यांनंतरही कायम आहे. लेकराला किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, अशी रास्त अपेक्षा या गरीब आई-वडिलांची आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील मनीषा संजय चोपडे हिच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. गेल्या महिन्यात थरकाप उडवून देणारी घटना देवगाव येथे घडली. चोपडे कुटुंबीयातील अकरावीत शिकणाऱ्या मनीषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह घरानजीक आढळून आला. चोपडे यांच्या घरात तीनही कन्यारत्न. थोरल्या मुलीचा विवाह झालेला. धाकटी नववीत, तर मनीषा अकरावीत शिक्षण घेत होती. आम्ही बाहेरगावी गेलेलो, तर मनीषा शाळेत गेलेली. अशा वेळी शेजारील वस्तीच्या माणसाचा फोन येतो काय, आणि मनीषाचा मृतदेह समोर दिसतो काय.. भरल्या डोळ्याने मन सुन्न करणारा प्रकार सांगताना आई-वडिलांना आपले दु:ख लपवता आले नाही. कोणत्याही परिस्थितीत मनीषाला न्याय मिळवूनच देऊ, अशी मनाशी खूणगाठ बांधलेला निश्चय त्यांच्या बोलण्यातून दिसून आला. वर्गात सर्वांशी हसून खेळून राहणाऱ्या मनीषाचा असा दुर्दैवी गूढ मृत्यू सर्वांच्या मनाला चटका लावणारा आहे. आजही गावात संतप्त आणि दहशतपूर्ण वातावरण आहे. मनीषाने आत्महत्त्या केलेली नसून वस्तुस्थिती बघता तिचा घातपात झाल्याचे कुटुंबासह गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकरणाचा पोलीस खात्याकडून तत्काळ तपास पूर्ण करण्यात येऊन आरोपींना गजाआड करून मनीषाला न्याय मिळवून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रारंभी आत्महत्त्येच्या प्राथमिक निष्कर्षाला पोहोचलेल्या पोलिसांना गावकऱ्यांचा रोष बघून अखेर खुनाचा गुन्हा नोंदवावा लागला. इतके दिवस उलटूनही तपासात प्रगती नसल्याचा आरोप करीत सदर प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी चोपडे कुटुंबीयांनी केली आहे. आमची मनीषा गेली, ती परत येणे शक्य नाही, पण किमान इतर कुणाच्या घरात तरी मनीषा प्रकरण घडायला नको म्हणून मारेकऱ्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे.मनीषाचा खून करून आत्महत्त्या भासविण्यासाठी शेतात मृतदेह अर्धवट जाळण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मनीषाला न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा मृत मनीषाचे काका राजेंद्र चोपडे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी २६ जानेवारी रोजी उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)