मनमाड येवला रोडवर टेहळणी मनोरा
By Admin | Updated: January 9, 2016 22:24 IST2016-01-09T22:23:39+5:302016-01-09T22:24:40+5:30
मनमाड येवला रोडवर टेहळणी मनोरा

मनमाड येवला रोडवर टेहळणी मनोरा
मनमाड: मनमाड येवला महामार्गावर मनमाड नजीक अनकाई किल्ला परिसरात उभारण्यात आलेल्या पोलीस टेहाळणी मनोऱ्याचे उद्घाटन इंडियन आॅइल कंपनीचे महाप्रबंधक बी.के. सिंह यांच्या हस्ते व मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
इंधन कंपन्या, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्न महामंडळ, जगप्रसिद्ध गुरुद्वारामुळे कायम संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहराच्या सुरक्षिततेसाठी येथून पाच कि.मी. अंतरावर अनकाई शिवारात पोलिसांसाठी टेहळणी मनोरा उभारण्यात आला. या मनोऱ्यामुळे मनमाड-शिर्डी राज्यमार्गावर पोलिसांना गस्त घालणे सुकर होणार असल्याने रस्ता लुटमारीच्या घटनांना आळा बसणार आहे. इंडियन आॅईल व
इंडेन गॅस प्लांट यांच्या संयुक्त
विद्यमाने गस्तीसाठी सदरचा मनोरा उभारण्यात आला आहे. फीत कापून या मनोऱ्याचे लोकार्पण करण्यात
आले आहे. यावेळी आयओसीचे उपमहाप्रबंधक शंकर शरण,
संजय पाराशर, एस. गणेश, पो.नि. भागवत सोनवणे, स.पो.नि.जनार्दन सोनवणे, पो.उ.नि.पी.एम. बनसोडे, श्रीमती चोरगे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)