शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वकिलवाडीत आंब्याचे झाड कोसळले; पाच दुचाकींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 16:47 IST

झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देअग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली

नाशिक : शहरातील अत्यंत गजबजलेल्या वकीलवाडी परिसरातील एका व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड सोमवारी (दि.१) दुपारच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणही व्यक्ती जखमी झाली नाही; मात्र वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकींचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.वकिलवाडीमध्ये असलेल्या सारडा संकुल या व्यापारी संकुलाच्या वाहनतळात असलेले आंब्याचे मोठे झाड दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानकपणे उन्मळून पडले. यावेळी संकुलाच्या वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकी झाडांच्या फांद्यांखाली दाबल्या गेल्या. झाडाच्या काही फांद्या वर्दळीच्या रस्त्यावरही येऊन पडल्यामुळे वाहतुकही विस्कळीत झाली होती. नागरिकांनी तत्काळ अग्नीशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. कोसळलेल्या वृक्षाच्या फांद्यांचा अडथळा पेट्रोलकटरच्या सहाय्याने जवानांनी कापून दूर केला. या दुर्घटनेत ॲक्सेस, ॲक्टीवा, अव्हेंजर यासांरख्या दुचाकींचे नुकसान झाले. दरम्यान, वादळवारा नसताना हिरवागार असलेला डेरेदार आम्रवृक्ष अचानकपणे कसा कोसळला? याविषयी परिसरात चर्चा रंगली होती. झाडांचा अडथळा कोणाकडून दुर केला जात आहे? असा सवाल काही वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे. आंब्याचे झाड हे पोकळ झाडांच्या प्रजातींमधील नसून वादळवारा नसताना अशा पध्दतीने झाड कोसळण्याची घडलेली घटना संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. मनपाच्या उद्यान विभागाने याबाबत पाहणी करुन पंचनामा करण्याची मागणी होत आहे.-----

 

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात