माजी ठेकेदाराविरुद्ध मनपा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:05 IST2017-08-05T01:04:55+5:302017-08-05T01:05:00+5:30
घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाºयांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका वसुलीसाठी आक्रमक झाली असून, सदर कंपनीने अंबरनाथ पालिकेतही ठेका घेतलेला असल्याने मनपाने अंबरनाथ पालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराची बिले रोखण्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

माजी ठेकेदाराविरुद्ध मनपा आक्रमक
नाशिक : घंटागाडीचा पंचवटी विभागातील माजी ठेकेदार समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरुद्ध कर्मचाºयांचे वेतन अदा न केल्याप्रकरणी महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल केल्यानंतर महापालिका वसुलीसाठी आक्रमक झाली असून, सदर कंपनीने अंबरनाथ पालिकेतही ठेका घेतलेला असल्याने मनपाने अंबरनाथ पालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराची बिले रोखण्याचे पत्र पाठविले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला संपूर्ण बिले अदा करणारे माजी आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनाही आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महापालिकेने मागील पंचवार्षिक काळात विभाग स्तरावर घंटागाडीचा ठेका दिला होता. त्यात पंचवटी विभागाचा ठेका ठाणे येथील समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. सदर ठेकेदाराने नंतर उपठेकेदार नेमून दिला होता. संबंधित ठेकेदाराकडून घंटागाडी कर्मचाºयांना वेतन नियमित अदा केले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असत. शिवाय, अनियमित घंटागाड्यांच्याही तक्रारी लोकप्रतिनिधींकडून वारंवार केल्या जात असत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारला होता. दरम्यान, संबंधित ठेकेदाराची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी संपूर्ण बिले अदा केली.