शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

भाविकांच्या मांदियाळीत फुलले मांगीतुंगी सिद्धक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 11:50 PM

सटाणा : देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी (दि. २५) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र फुलून गेले. पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.

ठळक मुद्देमहामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.

सटाणा : देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी (दि. २५) मांगीतुंगी सिद्धक्षेत्र फुलून गेले. पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब, सहपरिवार ऋषभदेवपुरम येथे रीघ लागली होती. सकाळपासून पवित्र वातावरणात व उत्साहात ऋषभगिरी येथे भगवान ऋषभदेवांच्या १०८ फुटी उंच अखंड पाषाण मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक झाला.

पंचामृत कलशाचा मान काल (दि. २५) पुण्याच्या सुजाता शहा व परिवाराने मिळवला. अभिषेकापूर्वी त्यांनी पुणे जैन संघटनेतर्फे पीठाधीश, कर्मयोगी रवींद्रकीर्ती स्वामींजीचा पुणेरी पगडी व चलनी नोटांचा हार घालून हृद्य सत्कार केला. यावेळी महोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. प्रथम कलशाचा मान कोलकात्याचे अजित पांड्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आल्याने त्यांनी धन्य झाल्याची भावना व्यक्त केली.

महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी केले. पवित्र जलाभिषेक, दुग्धाभिषेक, पंचामृताभिषेक करून भाविकांनी पुण्यप्राप्ती केली. महाशांतीधारा कलशाचा मान राजस्थानातील भाविकांनी मिळवला. सर्वांना पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामींजींनी आशीर्वाद प्रदान केले. महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.सोहळ्याच्या अकराव्या दिवशी शनिवारी गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफल अर्पण करण्यात आले. स्वामीजी रवींद्रकीर्ती महाराजांनी प्रास्ताविकात शुभाशीर्वाद दिले.हामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी. आर. पाटील, खजिनदार प्रमोद कासलीवाल अशोक दोशी, कमल कासलीवाल, संजय दिवाण, हसमुख व मिहीर गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मंगलाचरणाने प्रारंभ होऊन स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले.(२५ मांगीतुंगी)

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरSocialसामाजिक