महिलेचे मंगळसूत्र पंचवटीत खेचले
By Admin | Updated: September 11, 2014 00:27 IST2014-09-10T22:46:19+5:302014-09-11T00:27:03+5:30
महिलेचे मंगळसूत्र पंचवटीत खेचले

महिलेचे मंगळसूत्र पंचवटीत खेचले
पंचवटी : पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र खेचल्याची घटना दिंडोरीरोडवर टीव्ही सेंटर परिसरात घडली आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, प्रभावती शंकर देबटे (रा़ टीव्ही सेंटर परिसर, दिंडोरीरोड, नाशिक) ही महिला पायी जात असताना, पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी गाडीचा वेग कमी केला़ यानंतर पाठीमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला़ या प्रकरणी प्रभावती देबटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़