पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले
By Admin | Updated: November 8, 2015 23:34 IST2015-11-08T23:31:33+5:302015-11-08T23:34:02+5:30
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले
नाशिक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पायी जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र बळजबरी हिसकावून नेल्याची घटना उपनगर परिसरात घडली आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर विद्युत कॉलनीमध्ये राहणाऱ्या कमल रामदास गायकवाड (७३) या शुक्रवारी (दि़ ६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाण्याने थांबविले़ यानंतर एकाने त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून फरार झाले़
बसप्रवासात रोकड लंपास
बसप्रवासात प्रवाशाच्या खिशातील पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी घडली़ श्रावण लक्ष्मण रुपवते हे आंबेडकरनगर येथून काठेगल्लीपर्यंत बसने आले असता चोरट्यांनी त्यांच्या खिशातून पंचवीस हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ (प्रतिनिधी)