आॅस्ट्रेलियातील क्रिकेट शिबिरासाठी माने याची निवड
By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T22:47:38+5:302014-07-25T00:34:39+5:30
आॅस्ट्रेलियातील क्रिकेट शिबिरासाठी माने याची निवड

आॅस्ट्रेलियातील क्रिकेट शिबिरासाठी माने याची निवड
नाशिक : आॅस्ट्रेलियातील सिडनी येथील व्हिक्टोरिया क्रिकेट क्लबतर्फे होणाऱ्या तीन महिन्यांच्या सराव शिबिरासाठी नाशिक जिमखान्याचा खेळाडू चेतन माने याची निवड झाली आहे.
नाशिक जिमखान्यात नियमित सराव करणाऱ्या चेतनने नाशिकसह राज्यातील विविध क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्याच्या १४, १६, १९ व २२ वर्ष वयोगटांत त्याने उत्तम फलंदाजी केली आहे.
आॅस्ट्रेलियात तीन महिन्यांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर होणाऱ्या खुल्या क्रिकेट स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे. त्यास जिमखान्याचे संजय मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.