मनपाची ईआरपी प्रणाली ठप्प

By Admin | Updated: August 26, 2016 23:32 IST2016-08-26T23:30:28+5:302016-08-26T23:32:16+5:30

कामकाजावर परिणाम : फाईलींचा प्रवास थांबला

Mandapati ERP system jam | मनपाची ईआरपी प्रणाली ठप्प

मनपाची ईआरपी प्रणाली ठप्प

नाशिक : महापालिकेची ईआरपी (एंटरप्राईजेस रिसोर्स प्लॅनिंग) संगणकीय प्रणाली गेल्या १० ते १५ दिवसांपासून बंद पडल्याने फाईलींचा प्रवास लांबला आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाउन झाल्याने कामकाजही ठप्प झाले आहे. दरम्यान, संगणक विभागाकडे पुरेसे कुशल व प्रशिक्षणार्थी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दुरस्ती कामास विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे.
आयुक्त संजय खंदारे असताना महापालिकेत ईआरपी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु संगणक हाताळणीत कुशल कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सदर प्रणाली आत्मसात करण्यास बराच विलंब गेला. खंदारे यांच्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर मागील वर्षी महापालिकेचे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक त्यांनी ईआरपी प्रणालीनुसारच तयार करत सादर केले होते. या प्रणालीमुळे उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचा दावा त्यावेळी गेडाम यांनी केला होता. ईआरपी संगणकीय प्रणालीअंतर्गत महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागात विविध पे सेंटरकरिता सांकेतांक संगणक कोड देण्यात आलेले आहेत.
यापूर्वी सर्व कॉस्ट सेंटरसाठी एकच संगणक कोड ग्राह्य धरून अंदाजपत्रकात आकडेवारी नमूद करण्यात येत होती. परंतु नवीन ईआरपी प्रणालीनुसार प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र कॉस्ट सेंटर दर्शविण्यात येऊन त्यातून मिळणारा महसूल व त्यावर होणारा विविध बाबींवर खर्चदेखील स्वतंत्रपणे दर्शविण्यात येऊ लागला. त्याचप्रमाणे एका लेखाशीर्षातील रक्कम दुसऱ्या लेखाशीर्षातदेखील आयुक्तांच्या सहमतीने देण्याची व्यवस्था प्रणालीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mandapati ERP system jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.