शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नाशिक शहरातील मंडळांचा गणेशोत्सव तयारी पुर्ण

By श्याम बागुल | Updated: September 12, 2018 15:25 IST

सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात आलेल्या

ठळक मुद्देअवयव दानावर भर : पर्यावरण पुरक देखावे पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस

नाशिक : अवघ्या काही तासांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुरु असून, शहरातील जुन्या नाशकासह, बी. डी. भालेकर मैदान व नाशिक पश्चिम विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात आलेल्या अष्टविनायकाच्या सुबक कलाकृतीसह चांदीच्या गणपतीचे दर्शन नाशिककरांना घेता येणार आहे. अशोकस्तंभ गणेशोत्सव मित्र मंडळ दुर्गा देवीचा देखावा साकारणार असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर १०८ वर्षांची समृद्ध परंपरा असणाऱ्या दि नाशिक सराफ असोसिएशने यंदा पांडुरंगाचा देखावा साकारला असल्याचे अध्यक्ष महेश दिंडोरकर व प्रमोद कुलथे यांनी सांगितले आहे. अशोकस्तंभाजवळील ' मानाचा राजा ' मित्र मंडळाने सर्वात मोठी आणि २८ फुट उंच गणेशमूर्ती उभारली असून भव्यदिव्य राजवाड्याची प्रतिकृती साकारणार असल्याची माहिती अध्यक्ष सत्यम खंडाळे यांनी दिली. बी.डी. भालेकर मैदानात नरहरीचा राजा सामाजिक संस्था गड-किल्ले संवर्धन देखावा साकारणार असून रक्तदान व अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष विजय बिरारी यांनी दिली आहे. राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने आदिमायेची साडेतीन शक्ती पिठांची प्रतिकृती साकारणार असल्याचे स्पष्ट केले असून १ हजार १ किलोचा तांब्याचा गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. मंडळाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अवयव दान फॉर्म भरले जाणार असल्याचे अध्यक्ष सचिन रत्ने व गणेश बर्वे यांनी सांगितले आहे. महेंद्रा अँड महेंद्राने नागमणीचा देखावा साकारला असून बॉस , महेंद्रा सोना, एच.एल. आदींसह आठ मंडळांची बी. डी. भालेकर मैदानावर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कॉलेज रोडवर गोदा-श्रद्धा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सप्तशृंगी मातेची भव्य प्रतिकृती साकारणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुरेश आण्णाजी पाटील व अध्यक्ष कृणाल पाटील यांनी दिली आहे. जयबजरंग मंडळाच्या वतीने रामसेतू देखावा साकारण्यात येणार आहे. तर नरसिंह विद्यासागर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक देखावे साकारण्यात येणार असून स्पधार्ही आयोजित करण्यात येणार आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीNashikनाशिक