शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

मंडळांना मंडप उभारणीस अखेर अनुमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:46 PM

गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली.

ठळक मुद्देरास्ता रोको मागे गणेशोत्सवात आडकाठी करण्यास महापालिकेस मज्जाव

नाशिक : गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता सर्व गणेश मंडळांना जागेवरच अनुमती देण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दर्शविल्याने वादावर पडदा पडला असून, गणेशोत्सवावरील विघ्न टळल्याने भक्तांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंडप उभारणीस मज्जाव केला. त्यावर मंडळाचे अध्यक्ष तथा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी त्यांना जाब विचारला असता, प्रकरण तू-तू मै-मै पर्यंत गेले. नेरे यांनी गणपती बसवू देणार नाही, अशी भूमिका घेत, जुन्या नाशकातील सुमारे दहा ते बारा गणेश मंडळांचे मंडपाचे अतिक्रमण हटविण्याची तयारी सुरू केली. त्यावर मंडळाचे कार्यकर्ते व महापालिकेच्या अधिकाºयांमध्ये वाद झडला. सदरचे प्रकरण सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोहचले. नितीन नेरे यांनी समीर शेटे यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना दिले, तर शेटे यांनीही नेरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला असता त्यावर पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत नाशकातील गणेश मंडळांपर्यंत हे वृत्त वाºयासारखे पसरताच रविवारी सकाळी १० वाजता प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.रविवारी सकाळी ९ वाजेपासूनच शहरातील गणेशभक्तांची घनकर लेनमध्ये जमवाजमव सुरू झाली. उत्सवाच्या तोंडावर शहरातील वातावरण खराब होऊ नये म्हणून पोलिसांनी पुन्हा मध्यस्थी केली व गणेश मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीस अनुमती देण्याची तयारी दर्शविली. यावेळी समीर शेटे, गजानन शेलार, देवांग जानी, सचिन डोंगरे, सत्यम खंडाळे, मनीष महाकाळे, किशोर गरड, रामसिंग बावरी, गणेश बर्वे आदींनी पोलिसांशी चर्चा केली. यावर लेखी परवानगीची मागणी करण्यात आल्यावर पोलीस व महापालिकेने मंडप उभारणीच लेखी परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर जमलेल्या गणेशभक्तांनी ढोल, ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.बारा गणेश मंडळांवरील कारवाई टळलीघनकर लेन येथे मंडप उभारणीवरून वाद झाल्याने रविवार कारंजा, देवधर लेन, घनकर लेन, जुने नाशिक या गावाठाणातील गणेश मंडळांनी रस्त्यावर उभारलेले मंडप महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रविवारी पोलीस बंदोबस्तात काढण्याचे नियोजन केले होते. तथापि, सकाळीच गणेशभक्तांनी आंदोलनाची हाक दिल्याने महापालिका प्रशासन बॅकफुटावर जात कारवाई रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे रविवारी सर्वच गणेश मंडळांनी जोमाने कामास सुरुवात केली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका