शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मनविसेतही लवकरच फेरबदल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:24 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी दिले आहेत.

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी दिले आहेत.  मनसेच्या ‘राजगड’ कार्यालयावर रविवारी (दि.२६) शिवसेनेच्या युवा  सेनेच्या काही कार्यकर्त्यांसह शेकडो  नवीन विद्यार्थ्यांनी शिरोडकर यांच्या उपस्थितीत मनविसेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिरोडकर यांनी नवीन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मनविसेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव मेढे, जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, शहराध्यक्ष श्याम गोहाड, संदीप भवर, दीपक चव्हाण, सागर देवरे, मनोज रामराजे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  राज ठाकरे यांचे नेतृत्व सर्वांना समान संधी देणारे आहे. त्यामुळे नवीन-जुना असा कुठलाही भेदभाव संघटनेत चालत नाही. जो प्रामाणिकपणे काम करून संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवतो त्याला नक्कीच जबाबदारी सोपविली जाते, असे शिरोडकर यांनी सांगून महिनाभरानंतर प्रत्येक नवीन कार्यकर्त्याशी चर्चा करून सामाजिक कार्याचा आढावा घेत नवीन पदे व जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे स्पष्ट केले. महाविद्यालयीन निवडणुका घ्याव्यात महाविद्यालयीन वयात राजकीय नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका महत्त्वाच्या ठरतात. या निवडणुका घेतल्या जाव्यात, यासाठी मनविसेची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे. मात्र निवडणुकांचा कार्यक्रम महाविद्यालयीन स्तरावर आखताना आचारसंहिता कडक असणे देखील तितकेच गरजेचे आहे. आचारसंहिता कमकुवत असेल तर महाविद्यालयीन स्तरावरील निवडणुका अयशस्वी ठरतात. त्यामुळे आचारसंहिता कडक करून निवडणुका घेण्यास काहीही हरकत नाही, असे शिरोडकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :MNSमनसेNashikनाशिक