मनमाड महाविद्यालयाचे रासेयो शिबिर
By Admin | Updated: December 31, 2015 23:40 IST2015-12-31T23:38:40+5:302015-12-31T23:40:32+5:30
मनमाड महाविद्यालयाचे रासेयो शिबिर

मनमाड महाविद्यालयाचे रासेयो शिबिर
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यांमदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार शिबिर मेसनखेडे खु. येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन सरपंच कल्पना बिडगर यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामस्थांनी सर्व शिबिरार्थींचे स्वागत करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्राचार्य डॉ. निकम यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेची गरज, वनसंवर्धन व जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून सांगितले व या विषयीची जनजागृती करण्याचे आवाहन
केले.
शिबिर यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा. जे. के. देसले. प्रा. माहेन, प्रा. डॉ. आंबेकर, प्रा. गागरे, प्रा. काखंडकी यांनी परिश्रम घेतले. प्रा. व्ही. ए. दासनूर यांनी आभार मानले. (वार्ताहर)