शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गावठी कट्ट्यासह एक जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 1:04 AM

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या मोहिमेत १३५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत पोलिसांनी ८२ गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच सातपूर भागात एका गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली.

ठळक मुद्देकोम्बिंग आॅपरेशन : ८२ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारीवर अंकुश निर्माण करता यावा, यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये मंगळवारी (दि.१५) रात्री पोलिसांकडून शहरात कोम्बिंग आॅपरेशन राबविले गेले. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये अचानक राबविलेल्या या मोहिमेत १३५ सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत पोलिसांनी ८२ गुन्हेगारांवर कारवाई केली. तसेच सातपूर भागात एका गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक केली.विधानसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना शहरात निवडणुकीचा ज्वर चांगलाच वाढला आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवरदेखील कायदासुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी तितकीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात बॉर्डर पोलिसांसह दंगलनियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकांच्या तुकड्यांसह विविध पोलीस ठाण्यात संचलन तसेच रंगीत तालीमदेखील घेतली जात आहे.दरम्यान, नांदूर नाका, सिन्नर फाटा, म्हसरूळ गाव, राऊ हॉटेल परिसर, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, काठे गल्ली, आनंदवली, नारायण बापूनगर, पाथर्डी फाटा, वडनेरगेट, भगूर यांसह शहरातील विविध झोपडपट्टी भागांत पोलिसांनी गुन्हेगारांचा कसून शोध घेतला. यात १३५ पैकी ८२ गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली. तडीपार करण्यात आलेल्या ५९ पैकी एक सराईत तडीपार गुंड शहरात वावरत असताना आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली. या मोहिमेत नांगरे-पाटील यांच्यासह उपआयुक्त अमोल तांबे, लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात, सहायक आयुक्त समीर शेख,प्रदीप जाधव, आर. आर. पाटील, अशोक नखाते, अनिरुद्ध आढाव, ईश्वर वसावे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह २५ पोलीस निरीक्षक, ४९ सहायक निरीक्षक आणि ४५१ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.१०४ वाहनचालकांकडून २५ हजारांचा दंड वसूलशहरातील ३२ लॉजेस, हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली. तर मद्यपान करून वाहन चालविणाºया २८ जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या केसेस करण्यात आल्या. आयुक्तालय हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत ३५० वाहनांची तपासणी केली असता, १०४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत २४ हजार ८०० रु पये वसूल करण्यात आले. तसेच १०४ टवाळखोरांनाही पोलिसांनी दणका दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय