आडवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:47 IST2019-02-11T17:45:52+5:302019-02-11T17:47:13+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

आडवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोºहा ठार
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी (मधली) परिसरात बिबट्याने तीन वर्षाच्या गोºह्यावर हल्ला करून त्याला ठार केले. परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
आडवाडी येथील किसन बाबुराव गांजवे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यात रविवारी (दि.१०) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करून गोठ्यात बांधलेल्या तीन वर्षीय गोºहाच्या मानेला पकडून जवळील शेतात ओढत नेवून फस्त केले. बिबट्याने गोºह्यावर हल्ला केल्याने गोठ्यात बांधलेले गायी मोठमोठ्याने ओरडले असता घरातील किसन गांजवे यांनी बाहेर येवून पाहिले असता बिबट्या गोºहावर हल्ला केल्याचे पाहून त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे परिसरातील ग्रामस्थांना बोलावले. जमावाच्या आवाजाने बिबट्याने धुम ठोकली. मात्र, गोºह्याला जीव गमवावा लागला. या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी डोंगर कपारी असल्याने व डोंगरावर पाणी नसल्याने बिबटे मानवी वस्तीकडे पाण्यासाठी येतात व हल्ले करतात. तेव्हा वनविभागाच्या वतीने आडवाडी परिसरात ठिकठिकाणी पाणवटे उभारावे अशी मागणी करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक रोहित शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. परिसरात वारंवार घडणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दशहत पसरली असून पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.