शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

रयतेच्या राजाला मानवंदना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:47 PM

जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकांमध्ये तरुण मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे अनेक ठिकाणी कानावर पडत होते. दुचाकींना भगवे झेंडे बांधून फिरणाऱ्या युवकांमुळे शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.

ठळक मुद्देजन्मोत्सव : जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका; हजारो शिवप्रेमींकडून अभिवादन

सिन्नर/मालेगाव : जिल्ह्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौका-चौकांमध्ये तरुण मित्रमंडळांच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे अनेक ठिकाणी कानावर पडत होते. दुचाकींना भगवे झेंडे बांधून फिरणाऱ्या युवकांमुळे शहरातील वातावरण भगवेमय झाले होते.शिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली. डोळ्याची पारणे फेडणाºया या मिरवणुकीत हजारो सिन्नरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. येथील आडवा फाटा भागात छत्रपती संभाजी महाराज चौकात बुधवारी सकाळी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह आडवा फाटा येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक शशिकांत गाडे, स्टाइसचे अध्यक्ष पंडितराव लोंढे, प्रा. राजाराम मुंगसे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, कृष्णा कासार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटक सचिव रवींद्र काकड, वामन पवार, राजेंद्र रायजादे, सीटूचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे, दत्ता वायचळे, अशोक रूपवते, अनिल वराडे, पंकज जाधव, अनिल कर्पे, किरण गोजरे, सिल्व्हर लोटसचे संस्थापक दिलीप बिन्नर आदींसह तालुक्यातील विविध संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालयातील तरुण, शहरातील पुुरुष, महिला भगिनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.डोळ्याचे पारणे फेडणारी सिन्नरची मिरवणूकमहाराष्ट्रातील जनतेचे आराध्यदैवत असणाºया छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आडवा फाटा येथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील चित्ररथ, जिवंत देखावे तसेच मर्दानी आखाड्यातील मावळ्यांनी सादर केलेल्या शौर्याविष्काराने शहरवासीय अचंबित झाले. मिरवणुकीत विविध शाळांचा सहभाग शहरातील विविध शाळा-मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्यात शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा, पाळण्याचा प्रसंग, रायरेश्वराला अभिषेक, अश्वारूढ शिवाजी महाराज, दिमतीला भगव्या वेशातील शस्रधारी मावळे आणि मधूनच हर हर महादेवचा उठणारा गजर, हे जिवंत देखावे सिन्नरकरांचे लक्ष वेधून घेत होते. याशिवाय चित्तथरारक कसरतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. स्रीचा आदर करण्यासाठी अनेक शाळांनी सादर केलेल्या प्रबोधनात्मक देखाव्यांनी समाजाला स्री सन्मानाची शिकवण दिली.वातावण झाले भगवेमयमिरवणुकीत ट्रॅक्टरवर शिवरायांचे पुतळे तसेच ऐतिहासिक जिवंत देखावे सादर करण्यात आले होते. दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीयुद्ध, भालाफेक असे शौर्यकौशल्य सादर करण्यात येत होते. संबळ, ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, झेंडा पथक, झांज पथक, वारकरी मिरवणुकीची शोभा वाढवत होते. शहर व परिसरातील अनेक शाळांतील विविध चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. लहान मुलांनी सादर केलेला शौर्याविष्कार डोळे दिपवणारा होता. मिरवणूक बघण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वांनी बांधलेल्या भगव्या फेट्यांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज