ममदापूर परिसर जलमय
By Admin | Updated: August 2, 2016 23:34 IST2016-08-02T23:34:01+5:302016-08-02T23:34:22+5:30
ममदापूर परिसर जलमय

ममदापूर परिसर जलमय
ममदापूर : येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून चालू झालेल्या पावसाने सर्व पाणीसाठे पूर्ण भरले आहेत.
मंगळवारी पहाटे ५ वाजेपासून चालू झालेल्या पावसाने संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शाळेसह गावात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले. वाडी वस्तीवरील मुलांना पाऊस न उघडल्याने शाळेत येता आले नाही. परिसरातील काही शेतकऱ्यांनी पिकांना खते टाकली परंतु या पावसाने संपूर्ण खते पाण्याबरोबर वाहून गेले. मेंढ्या, शेळ्या पालन करणाऱ्या मेंढपाळांचे सध्या हाल होत आहेत. दिवसभर पाऊस चालू असल्याने जनावरांची उपासमार होत आहे. (वार्ताहर)