शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

बिटकोच्या व्हेंटिलेटर्समध्ये बिघाड; प्रसंगावधानामुळे बचावले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:06 PM

नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना ताजी असतानाच आता महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोविड रुग्णांच्या अतिदक्षता विभागात मंगळवारी (दि.१८) व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किटसारखा बिघाड झाला आणि चार ते पाच व्हेंटिलेटर्स बंद पडले. त्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून ऑक्सिजनची पर्यायी सोय केली आणि रुग्णांना कोणताही धोका निर्माण होऊ दिला नाही. परिणामी सर्वच रुग्ण सुरक्षित असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देपुन्हा धक्का : डबल ओटू दिल्याने चार ते पाच बाधितांवरील गंडांतर टळले

नाशिक : गेल्या महिन्यात डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना ताजी असतानाच आता महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात कोविड रुग्णांच्या अतिदक्षता विभागात मंगळवारी (दि.१८) व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किटसारखा बिघाड झाला आणि चार ते पाच व्हेंटिलेटर्स बंद पडले. त्यामुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून ऑक्सिजनची पर्यायी सोय केली आणि रुग्णांना कोणताही धोका निर्माण होऊ दिला नाही. परिणामी सर्वच रुग्ण सुरक्षित असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.

गेल्याच शनिवारी (दि.१५) भाजप नगरसेविकेच्या पतीने या रुग्णालयात मोटार घुसवून तोडफोड केली होती. ती घटना होत नाही तोच व्हेंटिलेटर्सच्या शॉर्टसर्किटचा प्रकार घडला आहे. महापालिकेच्या सर्वात मोठ्या कोविड रुग्णालय असलेल्या नवीन बिटको रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर १६ व्हेंटिलेटर्स बेड आहेत. मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका व्हेंटिलेटरमधून धूर येऊ लागला आणि पाठोपाठ चार ते पाच व्हेंटिलेटर्सदेखील बंद पडले. हा प्रकार कळताच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान बाळगून या व्हेंटिलेटर्सऐवजी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सोय केली आणि रुग्णांवर उपचारदेखील सुरू केले.

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु तोपर्यंत बिटकोमधील व्हेंटिलेटर्सच्या आगीच्या घटनेबाबत उलटसुलट चर्चा पसरल्या आणि अधिकारी तसेच नगरसेवकांची धावपळ सुरू झाली. आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे आणि कोविड सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड, डॉ. प्रशांत शेटे तसेच व विद्युत अभियंता वनमाळी, कुलकर्णी यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील तंत्रज्ञांची टीमदेखील घटनास्थळी पाठवली; परंतु तोपर्यंत सर्व अडचण दूर झाली होती.व्हेंटिलेटर्सला शॉर्टसर्किटमुळे तांत्रिक बिघाड होऊन काही वेळ अडचण आली असली तरी दहा मिनिटातच चार ते पाचही बंद पडलेले व्हेंटिलेटर्स पुन्हा कार्यान्वित झाले, त्याच बरोबर वेळीच उपाययोजना केल्याने सर्वच रुग्ण सुरक्षित असल्याची माहिती नवीन बिटको रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.बिटको रुग्णालयातील हे व्हेंटिलेटर्स दिवसरात्र सुरू असतात. त्यातून कदाचित तापल्यामुळे एका व्हेंटिलेटरमधून धूर आला आणि अन्य काही व्हेंटिलेटर्स तात्पुरते बंद पडले, या दरम्यान रुग्णांना तत्काळ डबल ओटू देण्यात आला, त्यामुळे अडचण आली नाही. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.- डॉ.आवेश पलोड, कोविड सेलप्रमुख, महापालिकापुन्हा पीएम केअर व्हेंटिलेटर्स चर्चेतनाशिक महापालिकेला पीएम केअर फंडातून मिळालेले हे व्हेंटिलेटर्स असून, त्यामुळे बिघडलेल्या या व्हेंटिलेटर्सचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीएम केअरमध्ये महापालिकेला गेल्यावर्षी ५६, तर यंदा साठ व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. त्यातील साठ व्हेंटिलेटर्स इन्स्टॉलेशनअभावी पडून आहेत, तर गेल्या वर्षी बिघडलेले चार व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरुस्तच आहेत.शॉर्टसर्किटची शक्यता नाहीबिटको रुग्णालयात व्हेंटिलेटर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता महापालिका कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी फेटाळून लावली आहे. महापालिकेच्या विद्युत अभियंत्यांनी तपासणी केली असता सर्व वायरिंग सुरक्षित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल