मालेगावी उष्णतेची लाट
By Admin | Updated: March 31, 2017 01:25 IST2017-03-31T01:25:05+5:302017-03-31T01:25:44+5:30
मालेगाव : शहर व तालुक्यात उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपमानाने उच्चांकी गाठली होती.

मालेगावी उष्णतेची लाट
मालेगाव : शहर व तालुक्यात उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपमानाने उच्चांकी गाठली होती. गुरुवारी एक अंशाने तपमानात घट झाली आहे. मालेगावचे तपमान ४२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला आहे. उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात होत असते. दुपारच्या सत्रात रस्तेही निर्मनुष्य होत असतात. गेल्या २१ मार्चपासून मालेगावच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. २१ मार्च रोजी ३८.८ अंश सेल्सिअस एवढे तपमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानाचा पारा वाढतच गेला. मंगळवार व बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक म्हणजे ४३.२ अंश सेल्सिअस एवढे तपमान नोंदविले गेले.
गुरुवारी एका अंशाने तपमानाने घट झाली असली तरी वातावरणातील उकाडा व उष्णता जैसे थेच आहे. आज दिवसभर कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला. सायंकाळी उशिरापर्यंत उष्णतेची दाहकता कायम होती.