मालेगावचे तपमान ४२.२ अंश सेल्सिअस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:58 IST2018-04-18T23:58:47+5:302018-04-18T23:58:47+5:30
मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मालेगावचे तपमान ४२.२ अंश सेल्सिअस
मालेगाव : शहर व तालुक्यात तपमानाने उच्चांक गाठला आहे. बुधवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४२.२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे. तपमानाने चाळिशी पार केली होती. बुधवारी तर उन्हाचा कहरच झाला. ऐन अक्षय्यतृतीया सणाच्या दिवशी शहर परिसराचे तपमान ४२.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. दुपारच्या सत्रात रस्ते निर्मनुष्य झाले होते. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. दुपारी अंगार बरसल्यासारखे ऊन पडले होते. सायंकाळी उशिरापर्यंत वातावरणातील उष्मा कायम होता. या उन्हाचा अबालवृद्धांना त्रास होत आहे. उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक गॉगल, टोपी, उपरणे आदींचा वापर करीत आहेत तर रसवंती, शीतगृह आदी ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरणात उकाडा जाणवत असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.